आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू; पाटोदा शहरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- मित्रांसोबत पाेहण्यासाठी गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी पाटोदा शहरात घडली. विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मृतदेह शोधात अडथळे येत असल्याने सायंकाळपर्यंत मृतदेह मिळाला नव्हता.

पाटोदा शहरातील माळी गल्ली भागात राहणारा सुमीत संजय कुलकर्णी हा १० वीमध्ये भामेश्वर विद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला. त्यास पोहता येत नसतानाही त्याने थेट कठड्यावरून विहिरीत उडी मारली तो खोल पाण्यात बुडाला. तो बुडत असल्याचे पाहून त्याच्यासोबतच्या मित्रांनी आरडओरड करत तिथून पळ काढला. काही वेळातच त् त्या ठिकाणी लोक जमा झाले. त्यातील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तत्काळ विहिरीमध्ये बुड्या घेत त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण त्याला वाचवण्यात यश आले नाही.
विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. यासाठी बोरीच्या झाडाच्या फांद्यांना दगड बांधून त्यांना पाण्यात सर्वत्र फिरवण्यात आले. मात्र, याचाही उपयोग झाला नाही.
पाटोदा शहरातील माळेगल्ली परिसरातील या विहिरीत सुमीतचा मृतदेह शोधणे सुरू होते. चौकटीतील छायाचित्रात सुमीत कुलकर्णी.
बातम्या आणखी आहेत...