आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचखोर तलाठी पुन्हा गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - सातबारावर विहिरीच्या हिश्श्याची नोंद घेऊन नक्कल देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना अपसिंगा (ता. तुळजापूर) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. दरम्यान, यापूर्वी लाचप्रकरणी या तलाठ्याला अटक केली होती.
अपसिंगा येथील शेतकरी शशिकांत बब्रुवान पवार यांची सात एकर बागायत शेती आहे. या शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे सुभाष घोडकर यांच्या शेतातील विहिरीचा निम्मा हिस्सा एक लाख रुपयांत खरेदी खत करून घेतला होता. या विहिरीची सातबारावर नोंद घेऊन नक्कल द्यावी, अशी मागणी शेतकरी पवार यांनी अपसिंगाचे तलाठी शिवलिंग गंठोड यांच्याकडे मागणी केली. वारंवार भेटूनही तलाठ्याने नक्कल देण्यास टाळाटाळ केली. पवार सोमवारी गंठोड यांना भेटले असता त्यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय नक्कल देणार नसल्याचे सांगितले. पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 7 ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर बाकीची रक्कम दीपक थोरात याच्याकडे देण्यास सांगितले. थोरात यास रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तलाठी गंठोड व थोरात याला अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बावीस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक एम. एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवलिंग गंठोड यांनी यापूर्वी 2008 मध्ये तीर्थ (बु.) येथे कार्यरत असताना जमिनीचा फेरफार करण्यासाठी शेतक-याकडून लाच घेतली होती. या प्रकरणात गंठोड यांना पकडण्यात आले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.