आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचे बिल दुसर्‍याच्या नावे; लाचखोर खाडेसह 3 अभियंत्यांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - सा. बां. विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता जी. एस. खाडेसह परभणीतील उपअभियंता, शाखा अभियंता व कंत्राटदारास रविवारी अटक झाली. एका कंत्राटदाराचे 9.5 लाखांचे बिल दुसर्‍याच्या नावे नोंदवल्याप्रकरणी ही कारवाई झाली. या चौघांना सोमवारी जामीन मंजूर झाला.

परभणीत रस्ता दुरुस्तीचे काम कंत्राटदार अब्दुल अजिज अब्दुल शकूर (सेलू) यांना मंजूर असताना खाडे, उपअभियंता ए. टी. नवटके, शाखा अभियंता मोहंमद मुजिबोद्दीन यांनी ते इफ्तेखार यांना मंजूर दाखवून नावे 9 लाख 68 हजार 422 रुपयांचे बिल तयार केले होते.


आठवड्यात दुसरा प्रकार
गेल्या आठवड्यात कंत्राटदार जीवन ठाकूर यांच्या फिर्यादीवरूनही खाडेंसह उपअभियंता ए. टी. नवटके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यातही असाच प्रकार उघडकीस आला होता.