आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bribing Chikhlikar Asset Growing Graph; 35 Lakhs In Nanded Locker

लाचखोर चिखलीकराच्या संपत्तीचा वाढता आलेख; नांदेडच्या लॉकरमध्‍ये 35 लाखांची रक्कम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - बांधकाम खात्याचा लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरच्या दोन लॉकरची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नाशिक येथील पथकाने शुक्रवारी तपासणी केली. चिखलीकरचे वडील मधुकर यांच्या नावे महाराष्‍ट्र बँकेच्या लॉकरमध्ये 35 लाख रुपये रोख आढळले. पत्नी स्वाती यांच्या नावे जिल्हा बँकेत असलेले लॉकर मात्र रिकामे होते. गुरुवारी दोन्ही लॉकर सील करण्यात आले होते. लॉकर उघडले त्या वेळी चिखलीकरचे वडील, आई पद्मावती व पत्नी स्वाती उपस्थित होते. महाराष्ट्र बँकेत 1999 मध्ये लॉकर सुरू करण्यात आले होते. दरम्यान, नाशकात कोर्टाने पुन्हा 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर बरे वाटत नसल्याने चिखलीकरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.संबंधित बातमी .


चिखलीकर रुग्णालयात दाखल
नाशिक कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर बरे वाटत नसल्याने चिखलीकरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


स्वातीला रडू कोसळले
चिखलीकरची पत्नी स्वाती यांना जिल्हा बँकेत आणले होते. लॉकर उघडण्यापूर्वी, व्यवस्थापकांच्या कक्षात बसवण्यात आलेल्या स्वाती यांना रडू कोसळले. नंतर त्यांना तातडीने रवाना करण्यात आले.


माझा मुलगा निर्दोष
कारवाई सुरू असताना चिखलीकरचे आई- वडील बाहेर इनोव्हामध्ये बसून होते. माध्यमांशी बोलताना वडील म्हणाले, कंत्राटदाराने सतीशला फसवले आहे. तो निर्दोष आहे.