आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिटी वाजवल्याचा जाब विचारला; घनसावंगीमध्ये बहीण-भावावर चाकूने हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- बहिणीला बघून शिटी का मारली म्हणून जाब विचारणाऱ्या भावासह बहिणीलाही शिवीगाळ करून चाकूने हल्ला करण्यात आला. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अंकुश बन्सी शेळके, श्याम अंकुश शेळके, कैलास भीमराव शेळके, राजेश शामराव शेळके (सर्व रा. राणी उंचेगाव, ता. घनसावंगी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी हा त्याच्या चुलत बहिणीला घेऊन दुचाकीवर दवाखान्यात जात होता. दरम्यान, महाराष्ट्र बँकेजवळ श्याम शेळके याने मुलीला बघून शिटी वाजवली. दरम्यान, मुलीचा भाऊ मुलगी हे जाब विचारण्यासाठी गेले असता, श्यामने शिवीगाळ केली. तसेच मुलीच्या भावाच्या छातीवर, पाठीवर कमरेवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शिवाय, मुलीलाही चाकूने मारहाण करून जखमी केले. या वेळी श्यामसोबत असलेल्या इतर तिघांनीही काठी गजाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना ताब्यात घेतले
याप्रकरणातील आरोपींना सायंकाळी ताब्यात घेतले अाहे. दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने सर्व बाजूंनी तपास करत आहोत. तपासात सखोल चौकशी केली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. पाटील म्हणाले.
माहिती मागवली आहे
याप्रकरणातील आरोपींच्या अटकेसंदर्भातील माहिती मागवली आहे. दुपारीच संबंधित तपास अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे, असे अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...