आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोर्ट आवारात बहिणीच्या नवर्‍यासोबत ‘फ्री स्टाइल’; गंभीर जखमीवर औरंगाबाद येथे उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- खटल्याच्या सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या साले-मेहुण्यांमध्ये न्यायालयाच्या आवारात जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार आज (मंगळवार) दुपारी घडला. यात गंभीर जखमी झालेल्या एकास पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे, तर अन्य एका जखमीवर भोकरदन येथील ग्रामीण रुगणालयात उपचार सुरु आहेत.

 
 प्रवीण अशोक कुटुंबरे यांचा त्यांच्या पत्नीशी असलेल्या कौटुंबिक वादाचा खटला भोकरदन न्यायालयात सुरु आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान या खटल्याच्या सुनावणीसाठी प्रवीण कुटुंबरे व प्रतिवादी असलेले त्याचे सासरे कपूरचंद काकरवाल, गोविंद काकरवाल हे भोकरदन न्यायालयात आले होते. सुनावणीला वेळ असल्याने ते न्यायालयातील व्हरांड्यात बसलेले असताना प्रवीण व त्यांचा मेहुणा (शालक) गोविंद यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाल्याने दोघेही जखमी झाले. यावेळी गोविंद काकरवाल गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. उपस्थितांनी त्यांचे भांडण सोडवले. दरम्यान त्यांच्या नातेवाइकांना व न्यायालयात हजर असलेल्या पोलिसांनी भोकरदन पोलिस ठाण्याला भांडणाची माहिती कळवली. त्यानंतर दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या गोविंद काकरवाल यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुगणालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...