आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुर्डीथोटमध्ये पैशाच्या वादातून भावाचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शेतीच्या पैशाच्या वादातून भावाने भावावर कोयत्याने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजता बीड तालुक्यातील सुर्डीथोट येथे घडली.

सलीम उस्मान शेख याने काही दिवसांपूर्वी आपला मोठा भाऊ जुहूर उस्मान शेख याला १४ लाख रुपयांत दोन एकर शेती विकली होती. जमीन घेताना व नंतर असे मिळून जुहूरने सलीम याला १२ लाख दिले होते. व्यवहारातील उर्वरित दोन लाख रुपयांसाठी सलीमने जुहूरकडे तगादा लावला होता. मुलीच्या लग्नासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगत दोन लाख रुपये दे म्हणत सलीमने जुहूरसोबत वादही घातला होता. पैशाच्या सततच्या तगाद्यालाकंटाळून जुहूरने रविवारी पहाटे पाचच्या दरम्यान प्रातर्विधीसाठी जाणाऱ्या सलीमच्या मानेवर कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. पोलिस निरीक्षक एम. एल. प्रधान यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मृत सलीम शेखची पत्नी मुमताज शेख हिने पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जुहूर शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.