आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BT Seeds Sale New Rate Says Guardian Minister Lonikar

सुधारित दराने बी.टी. बियाणे विक्री करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मागील दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने बी.टी. बियाण्यांचे दर १०० रुपये प्रति पाकीट कमी केले आहेत. यानुसार सुधारित विक्रीच्या किमती सर्वांनी माहिती करून घ्यावी. तसेच सुधारित किंमती पेक्षा जादा दराने बियाणांची विक्री केल्यास संबंधित उत्पादक, वितरक व विक्रेत्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री लोणीकर यांनी दिला. बुधवारी जालना, परतूर व मंठा तालुक्यासाठी परतूर येथे आयोजित बियाणे, खते उत्पादक व विक्रेत्यांच्या खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत लोणीकर बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे आदींची उपस्थिती होती. यावेळी बियाणे व खत विक्रेत्यांनी िब.टी. बियाण्याच्या सुधारीत दरांबाबत अडचणी मांडल्या.
बी.टी. कापूस बोलगार्ड (बी.जी.१) च्या एका पाकीटाची किंमत पूर्वी ८३० रूपये होती, सुधारीत किंमत ७३० रूपये आहे. बी.टी. कापूस बोलगार्ड (बी.जी.२) च्या एका पाकीटाची किंमत पूर्वी ९३० रूपये होती, सुधारीत किंमत ८३० रूपये आहे. ८ जून २०१५ पासून सुधारीत कमाल विक्री किंमत ठरवण्यात आली आहे. सुधारीत कमाल विक्री दरानुसार बी.टी. कापूस बियाण्याची विक्री करण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहे. अधिसूचना दिनांकापूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या दरांची पाकीटे व अधिसुचना दिनांकानंतर प्राप्त झालेली नवीन दरांची कापुस बियाणे पाकीटे सुधारीत दरानेच विक्री होतील, याची दक्षता घ्यावी.