आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे बांधण्याइतके शौचालये बांधणे अवघड नाही : गोयल, 17 हजार पंचायती हागणदारीमुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा प्रत्येक गोष्टीत मागे राहतो. अनुशेषांबाबत मराठवाडा मागे आहे. मात्र स्वच्छ भारत मिशनच्याबाबतीत मराठवाडा मागे राहता कामा नये. आपल्या धरण बांधायचे नाही. त्यामुळे शौचालये उभारणे धरण बांधण्याइतके अवघड नाही, असे सांगत अधिकाऱ्यांनी स्वच्छ भारत मिशन गांभीर्याने घेण्याचा इशारा राज्याचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांना दिला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मराठवाड्यातील सर्व जिलह्यातल्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या या आढावा बैठकील श्यामलाल गोयल, पाणीपुरवठा प्रकल्प संचालक रुचेश जयवंशी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांसह  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात १७ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त : यावेळी  गोयल यांनी सांगितले की, राज्यात २७ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १७ हजार ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. राज्यात कोकण, पुणे विभाग सर्वाधिक आघाडीवर आहेत. त्या तुलनेत मराठवाडा पिछाडीवर आहे. किमान स्वच्छतेच्या बाबतीत मराठवाडा पिछाडीवर राहता कामा नये. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
२ ऑक्टोबरपर्यंत कामे पूर्ण करा
२ ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यातल्या सर्व ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याच पाहिजेत. मराठवाड्यात सध्या जालना आघाडीवर आहे. जालना जिल्ह्यात ९३ टक्के काम पुर्ण झाले असून उस्मानाबाद जिल्ह्यात ७८ टक्के तर नांदेड ५६, औरंगाबाद ६८, लातूर ७६ बीड ६७, हिंगोली ६५ टक्के काम झाले आहे. तर विभागातल्या ७६ पैकी ७२ नगरपालिका हागणदारीमुक्त झाल्याची माहिती विभागीय अायुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

पंचायत समिती पातळीवर तक्रार निवारण कक्ष सुरू करा
पंचायत समिती पातळीवर १५ दिवसात एक दिवस तक्रार निवारण कक्ष सुरु करुन लोकांच्या तक्रारी सोडवण्याचे काम करावे. त्यामुळे तीन चे चार महिन्यात  लोकांच्या तक्रारी कमी होतील असे मत गोयल यांनी व्यक्त केले.

सीईओंनी पुढाकार घ्यावा
गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी आता सीईअाेंनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी फारसा पुढाकार घेतला नसल्यामुळेच ग्रामस्वच्छतेमध्ये आपण पिछाडीवर असल्याचे भापकर यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा याेजनांचाही अाढावा घेण्यात अाला. 
बातम्या आणखी आहेत...