आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमत येथील विवाहितेस जाळले; ५ जणांना जन्मठेपेची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली : वसमत येथील मदिनानगर भागातील विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंद व दोन नणंदोई या पाच जणांना गुरुवारी वसमत येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एन. आरगडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सरकारी वकील एन. आर. काकाणी यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार ६ एप्रिल २०१५ रोजी वसमत येथील मदिनानगर भागातील विवाहित महिला अजमेरी शेख रियाज ही स्वयंपाक करून घरी बसली होती, तर त्याच भागात राहणारी अजमेरीची सासू आसिना शेख पाशूमियाँ ही तिची मुलगी नसीम शेख अमजत यांच्या घरी गेली. त्याच घरी अजमेरीचा पती शे. रियाज शे.पाशू गेला. त्यामुळे सासू, पती यांना जेवण करण्यासाठी अजमेरी नणंदेच्या घरी गेली असता सासू आसिना हिने तिला शिव्या दिल्या व मला जेवायला यायचे नाही, तू माझ्या मुलीच्या घरी का आली? असे म्हणत अजमेरीला शिव्या दिल्या.
या वेळी सासूसह पती, नणंदोई, नणंद यांनी अजमेरीला मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतले व पेटवून दिले. यामध्ये गंभीर भाजलेल्या अजमेरीच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. फौजदार व्ही. के. मुंडे यांनी तपास करून वसमत येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सुनावणी होऊन आरोपींना दोषी ठरवले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एन. आरगडे यांनी शे. रियाज शे. पाशू (पती), उस्मान शे. दाऊद (नणंदोई), शे.आसिना शे.पाशू (सासू), नसीम शे. अमजद (नणंद), शे. उस्मान शे. जलाल (नणंदोई) या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नंदकुमार काकाणी यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील एस. के. दासरे यांनी सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...