आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus Accident News In Maharashtra; 35 Passenger Injured

'काळा'वार:उस्मानाबादजवळ भरधाव बस कमानीवर धडकून 35 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर/पाचोड/उस्मानाबाद/बीड/जालना- शनिवारचा दिवस प्रवासासाठी काळा ठरला. मराठवाड्यात चार अपघातांत 6 जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबादजवळ दिशादर्शक कमानीला बस धडकून 35 प्रवासी जखमी झाले. लातूर जिल्ह्यातही खासगी बस उलटून 14 जण जखमी झाले.

गंगापूर-कायगाव या कित्येक वर्षांपासून खराब असलेल्या रस्त्यावर स्मशानभूमीसमोर शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी जीप (एमएच 17 के 8157) उलटली. या अपघातात सिंधुबाई बबनराव राऊत (50, रा. भातकूडगाव, ता. शेवगाव) व मनीषा संदीप आरडे, (38, रा. प्रवरासंगम, जि. नगर) यांचा मृत्यू झाला. गंगुबाई मच्छिंद्र गवळी व केसरबाई नाना रोकडे या महिला झाल्या आहेत.

जालन्यात युवकाचा मृत्यू
जालना- जालना-नाव्हा रोडवर धारकल्याणजवळ चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वार विश्वंभर रामभाऊ इंगोले (35) याचा जागीच मृत्यू झाला.

खासगी बस उलटून 14 जखमी
लातूर- उदगीर-भालकी रस्त्यावर मोघा गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स उलटून 14 जण जखमी झाले. यापैकी दोघांना जबर मार लागला. हा अपघात शनिवारी सायंकाळी झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणे जिवावर बेतले
शिरूर (जि. बीड)- मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेसह तरुणीला ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. या दुर्घटनेत दोघींचाही मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी सहा वाजता बीड-पाथर्डी राज्यमार्गावर वार्णी शिवारातील हॉटेल अश्वमेधजवळ घडला. काशीबाई छत्रपती नन्नवरे (45), कविता बबनराव तळेकर (दोघी, रा. शिरूर) अशी मृतांची नावे आहेत. काशीबाई, कविता आणि संगीता विजयकुमार झिंजुर्डे या तिघी शनिवारी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. बीड-पाथर्डी राज्य मार्गावरून चालत जाऊन वार्णी शिवारातील हॉटेल अश्वमेधजवळ पोहोचल्या. तेथे व्यायाम करत असताना बीडहून पाथर्डीकडे जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या ट्रॅव्हल्सने काशीबाई व कविता या दोघींना जोराची धडक दिली. काशीबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी तरुणी कविता तळेकरला जिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. संगीता झिंजुर्डे बचावल्या.

पाचोडला एक ठार
पाचोड- रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेने हिरालाल जयसिंग जुरुळे यांचा मृत्यू झाला. ही घटना औरंगाबाद-सोलापूर मार्गावर शुक्रवारी रात्री आठ वाजता देवगाव फाटा कमानीजवळ घडली.

उस्मानाबादजवळ बस अपघात
उस्मानाबाद- भरधाव बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस दिशादर्शक कमानीवर आदळली. या अपघातामध्ये 35 प्रवाशांसह चालक व वाहक जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे उस्मानाबाद शहराजवळील तेरणा जलशुद्धीकरण केंद्राजवळ घडला.

खड्डेमय रस्त्यामुळे गंगापूरजवळ काळीपिवळीला अपघात झाला. वेगात हे वाहन तीन वेळा उलटे झाल्यामुळे दोन महिलांचे प्राण गेले.

शिरूरमध्ये अंत्यसंस्कार : काशीबाई व कविता त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर दोघींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले.

बाजारपेठ बंद : अपघाताचे वृत्त कळताच शिरूरमधील बाजारपेठ बंद करण्यात आली. धडक देणार्‍या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिस शिर्डीकडे रवाना झाले.

कविताचे स्वप्न भंगले : कविताचे डीएडपर्यंत शिक्षण झाले होते. शिक्षिका होण्याचे होण्याचे तिचे स्वप्न या अपघाताने भंगले. काशीबाई या गृहिणी होत्या.

चार अपघातांत सहा प्रवाशांचा मृत्यू
बीड जिल्ह्यात ट्रॅव्हल्सने दोघींना चिरडले; गंगापूरजवळ काळीपिवळी उलटून दोन महिला ठार
उस्मानाबाद : भरधाव बस दिशादर्शक कमानीवर धडकली. अपघातात 35 जण जखमी झाले.