आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus And Truck Accident Near Beed, 14 Passengers Injured

भरधाव बस-ट्रकची समोरासमोर धडक; 14 प्रवासी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- भरधाव ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना नेकनूर - केज रोडवरील येळंबघाट जवळील नांदूरघाट फाट्यावर रविवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली. अपघातातील जखमींवर सुरुवातीला नेकनूर व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

अंबाजोगाईहून औरंगाबादकडे येणारी बस (एमएच २० बीएल २०१०) सकाळी सातच्या दरम्यान बीड तालुक्यातील नांदूर फाट्याजवळ अाली असता मांजरसुंब्याहून केजकडे निघालेल्या भरधाव ट्रकने बसला समोरून जाेराची धडक दिली. या अपघातात शंकर वसंत चव्हाण (६२, रा. नागझरी, ता. अंबाजोगाई), अलीम मुसा शेख (५०), इम्रान अलीम शेख (२५) इर्शाद मणियार शेख (३०, सर्व रा. अंबाजोगाई), निजाम हुसेन मुजावर ( बसचालक, मांजरसुंबा), कौशल्याबाई विश्वनाथ साखरे(रा. अंजनडोह, ता. धारूर), भाऊसाहेब भगवान साळुंके(धारूर)या आठ जणांसह अन्य पाच प्रवासी जखमी झाले. जखमींवर सुरुवातीला नेकनूर रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

शहरातील बार्शी नाका परिसरात दोन कार व एक दुचाकीचा रविवारी दुपारी तिहेरी अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.