आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराईजवळ ट्रक-बसची भीषण धडक; 20 प्रवासी जखमी, धडकेनंतर कापला गेला बसचा पत्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई-  ट्रक-बसची समोरासमोर धडक होऊन अपघातात चालकाच्या बाजूने बसचा पत्रा कापत गेल्याने २०  प्रवासी जखमी झाले तर अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात  धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढीजवळील  कॅप्टन  कृष्णकांत पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता  घडला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद सुरू होती.  
 
जालन्याहून अंबाजोगाईकडे  बस (एम.एच.१४ बी.टी.१३७६ ) निघाली होती, तर याच वेळी  बीडहून जालन्याकडे  स्टील भंगार मालवाहू ट्रक (आर.जे.०२ जीए ५८५१)  चालला होता. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास  धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी जवळील कॅप्टन कृष्णाकांत पेट्रोल पंपासमोर  दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातात ट्रकच्या धडकेने बसचा चालकाच्या बाजूचा पत्रा कापत जाऊन  पाच सीटचे नुकसान झाले. बसमध्ये गेवराईहून बीडला जाण्यासाठी २० प्रवासी बसले होते ते जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमीत बसमधील सखाराम चाळक (६०, किनगाव, ता. गेवराई), बाबासाहेब घोंगडे (२९, रेवकी, ता. गेवराई), शिवदास चव्हाण (६०), जनाबाई चव्हाण (५०), दामू चव्हाण, (सुशी, ता.गेवराई ), मीराबाई राख (५०,  केकतपांगरी, ता.गेवराई), विजूबाई काळापारे (४०), महेश  काळापारे (४०, लुखामसला, ता. गेवराई), मच्छिंद्र लेढाळ (४०, रोहितळ, ता. गेवराई), ज्योती जाधव (२४), तात्या जाधव ( नेवले, ता. लातूर), स्वाती माळी (२५, बाभळगाव, बीड), फरजाना कुरेशी (४०), सलमा बागवान (४५), आतिका कुरेशी (१३, सुखापुरी, ता. अंबड), गायत्री ढोकळे (३२, राजपिंपरी, ता. गेवराई) मच्छिंद्र काटकर, सुनील कोठेकर  यांचा समावेश आहे.  
 
तीन प्रवासी गंभीर जखमी : अपघातातील बसमधील प्रवासी सखाराम चाळक, गायत्री  ढोकळे, स्वाती माळी हे गंभीर जखमी झाले.

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प   
धुळे-  सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गढीजवळ  मधोमध अपघात घडल्याने मार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. अपघातानंतर जखमींना येथील  शासकीय रुग्णवाहिकेसह खासगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी गेवराई ठाण्याचे पोलिस, महामार्ग पोलिस व एसटी महामंडळाचे अधिकारी यांनी भेट दिली.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... बस-ट्रकच्या भीषण अपघाताचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...