आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसचालकाची मुलीस मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - गर्दीमुळे चालकाच्या केबिनमधून बसमध्ये प्रवेश करणार्‍या विद्यार्थिनीस चालकाने बसस्थानकात मारहाण केल्याची घटना पैठण येथे घडली. या प्रकरणी बसचालकाविरोधात पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील 14 वर्षीय पूजा नवनाथ वाघमारे ही शाळेसाठी रोज पैठण येथे बसने प्रवास करते. सोमवारी शाळा सुटल्यावर पूजा वाघमारे गावी जाण्यासाठी पैठण बसस्थानकात आली असता तिने पैठण-जालना बसमध्ये (एमएच 20 डी 9317) प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवासी संख्या जास्त असल्याने तिला बसमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ती चालकाच्या केबिनमधून बसमध्ये शिरली. हा प्रकार पाहून बसचालक आदिनाथ बडेचा राग अनावर झाला व त्याने पूजा वाघमारे हिला बसच्या खाली ओढून चपलेने मारहाण केली. बसस्थानकात हा प्रकार सुरू असल्यामुळे सर्वांना धक्का बसला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पूजा वाघमारे व अन्य विद्यार्थ्यांनी थेट पैठण पोलिस ठाणे गाठून बसचालकाविरोधात तक्रार दिली. बसचालकाला अटक करण्याची मागणी करण्यात आली.

बसमुळे विद्यार्थ्यांचा छळ
ग्रामीण भागातून साडेपाच हजार विद्यार्थी शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पैठणला ये-जा करतात. यातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे मासिक पास आहेत. त्यामुळे ते बसने प्रवास करतात. मात्र, पैठण बसस्थानकातील मुजोर चालक, वाहकांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यात विद्यार्थिनीस झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे बसने प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

शाळा सुटल्यानंतर मी बसने गावाकडे जाण्यासाठी निघाले असता बसमध्ये खूप गर्दी होती. घरी जाण्यासाठी उशीर होऊ नये तसेच बसमध्ये जागा मिळावी म्हणून चालकाच्या केबिनमधून चढण्याचा प्रयत्न केला. या वेळी बसचालकाने मला थेट मारहाण केली, असे पूजा वाघमारे या विद्यार्थिनीने सांगितले.