आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसची दुचाकीला धडक, वकिलासह बालक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- येथील साखरपुडा आटोपून पुण्याला निघालेल्या खासगी मिनी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वकिलासह बसमधील दोन वर्षांचा बालक जागीच ठार झाला. अपघातानंतर बस उलटल्याने सतरा प्रवासी जखमी झाले. अंबाजोगाई-कळंब मार्गावर पळसखेडजवळ रविवारी रात्री ७.३० वाजता मिनी बसने (एमएच १२ केक्यू ८९८९) दुचाकीला (एमएच ४४ एफ ६२६४) समोरून धडक दिली. यात दुचाकीवरील अॅड. जगदीश आत्माराम मस्के (३०, सावळेश्वर, ता.केज) व बसमधील मुलगा रणवीर गौतम साबळे (०२, पुणे) हे जागीच ठार झाले. मस्के हे अंबाजोगाई कोर्टात ज्युनियर वकील होते.