आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus On Privat Diseal Pump: Imlimentation Starts From Friday

डिझेलसाठी एसटी खासगी पंपावर; शुक्रवारपासून अंमलबजावणी सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - शासनाने डिझेलवरील अनुदान बंद केल्यामुळे अडचणीत आलेली एसटी शुक्रवारपासून डिझेलसाठी खासगी पंपावर जाऊ लागली आहे. राज्य परिवहन महामंडळाने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयाची शुक्रवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

महागड्या डिझेलमुळे एसटीचे दररोज दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान होऊ लागल्यामुळे महामंडळाने खासगी पंपावरून डिझेल खरेदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज्यातील खासगी पंपचालकांसोबत चर्चा करण्यात आली. गेल्या दोन दिवसांमध्ये डिझेलच्या दराबाबत पंपचालकांसोबत चर्चा करण्यात आली. काही अंशी कमी दराने डिझेल देणा-या पंपांची निवड करून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून बहुतांश आगाराच्या गाड्या डिझेलसाठी खासगी पंपांवर गेल्या. उस्मानाबाद शहरातील सांजा रोडवर असलेल्या गरड यांच्या पंपावर डिझेल खरेदी करण्यात आले. पंपचालकांना दर चार दिवसांनी डिझेलची रक्कम देण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळपासून पंपावर डिझेल खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे.

रात्रीपर्यंत 7 गाड्यांमध्ये 1200 लिटर डिझेल भरण्यात आले. महामंडळाने खासगी पंपावर डिझेल खरेदी करावी, अशी मागणी विभागीय सल्लागार समितीचे सदस्य अनिल जगताप यांनी केली होती. दै. ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम डिझेल खरेदीबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.