आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसस्थानक निवाऱ्याची दुरवस्था, प्रवासी रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथरूड - तुळजापूर-शिर्डी मार्गावरील खव्यासाठी प्रसिद्ध पाथरूड येथील बसस्थानक निवारा गेली १० वर्षे दुरवस्थेत आहे. यामुळे परिसरातील २५ गावांमधील प्रवाशांना रोडवरच बसची प्रतीक्षा करत थांबावे लागते.

उन्हाळा व पावसाच्या दिवसांमध्ये लहान मुले, महिला व वृद्धांची यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, शिर्डी, तुळजापूर, नगर, बीड यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या एसटी बस पाथरूड स्थानकावरून ये-जा करतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या असते. बस येईपर्यंत प्रवाशांना रोडच्या कडेने ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत.

अपघाताचा धोका
तुळजापूर-शिर्डी मार्गावरील पाथरूड येथील बसस्थानकात निवारा नसल्याने प्रवाशांना रोडच्या कडेने ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे वाहन अंगावर येऊन अपघाताची शक्यता टाळता येत नाही. काही वर्षांपूर्वी आनंदवाडी येथील प्रवाशांच्या अंगावर बस येऊन अपघात झाला होता.
बातम्या आणखी आहेत...