आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस-टेम्पोच्या धडकेत एक ठार, बीड-परळी महामार्गावरील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- बीडहून वडवणीच्या आठवडी बाजारासाठी जाणारा टेम्पो व नांदेडहून बीडकडे जात असलेल्या बसचा समोरासमोर अपघात होऊन टेम्पोतील एक जण ठार झाला. दोन्ही वाहनांतील १० जण जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. ही घटना वडवणीजवळील मैंदा फाट्याजवळील बीड-परळी राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी दहा
वाजता घडली.

वडवणीपासून चार किलोमीटर अंतरावर बीड-परळी राज्य महामार्गावर मैंदा फाटा अाहे. बुधवारी सकाळी १० वाजता बीड येथून वडवणी येथील आठवडी बाजारासाठी टेम्पो (एमएच २३, २७५) निघाला होता. याच वेळी नांदेडहून बीडकडे बस (एमएच २०, १७९६) येत होती. मैंदा फाट्यावरील हनुमंत माळी यांच्या वीटभट्टीजवळ दोन्ही वाहने समोरासमोर आली. बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टेम्पोने बसला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात टेम्पो मालक ख्वाजा बागवान (६०, रा. रविवार पेठ, बीड) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असलेले शेख मजहर (रा. खासबाग), सय्यद मियां तंबाखूवाले (रा. नागोबा गल्ली), राजा चाँद बागवान (रा. रविवार पेठ, बीड) या चार जणांसह बसमधील सात प्रवासी जखमी झाले.