आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस - ट्रकच्या समोरासमोर धडकेत दोन ठार, २७ प्रवासी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोनजण ठा र तर २७ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता आष्टा (कासार) मोडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर घडला. जखमींवर सोलापूर व उमरगा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शीला जगन्नाथ झाकडे (४० रा.कुन्हाळी ता. उमरगा) व संगीता शंकर डोंगरे (४५, रा.भंगारकिणी ता.अक्कलकोट) अशी मृतांची नावे आहेत. मुंबई आगाराची हैदराबाद ते मुंबई जाणारी बस (एम.एच.४० एम. ९१९७) उमरगा तालुक्यातील आष्टा (कासार) गावाजवळील भोसगा साठवण तलावाजवळ आली असता सोलापूर येथून भरधाव ट्रक (एम.एच.२५ बी. ९८११) चालकाचा ताबा सुटल्याने त्याने विरुद्ध दिशेने येणार्‍या बसला जोराची धडक दिली.

ट्रक दरीत; कन्नड घाट चार तास जाम
चाळीसगावहून औरंगाबादला जाणारा साखरेचा ट्रक कन्नड घाटातील दरीत बुधवारी रात्री कोसळला. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रक चक्काचूर झाला. क्रेनद्वारे ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याने गुरुवारी चार तास वाहतूक ठप्प होती.

ट्रॅक्टर- दुचाकी अपघातात १ ठार
सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारामती अॅग्रो साखर कारखान्यासमोर ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार अशोक अंभोरे (६०) यांचा मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले.

दाेन दुचाकींच्या धडकेत दोघे ठार
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. जालना तालुक्यातील गोलापांगरी-बठाण रोडवर गुरुवारी सकाळी ९ वाजेदरम्यान ही घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकींचा अक्षरक्ष: चुराडा झाला. परमेश्वर पुंजाराम लिहिणार (५५, काटखेडा, ता. अंबड जि.जालना) व अस्लम आलम शेख (२७, कोळी बोडखा, ता. जि.औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत. यातील अस्लम शेख हा गोलापांगरीकडून बठाणकडे तर परमेश्वर लिहिणार बठाणहून काटखेडाकडे जात असताना हा अपघात झाला.

ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार लातूर|ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. उदगीरजवळील बनशेळकी रोडवर हा अपघात झाला. महादेव श्रीराम लोहारे असे मृताचे नाव आहे.