आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बस थांबताच चाक निखळले, आठ प्रवाशांचे जीव वाचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - औरंगाबादहून यावलकडे जाणाऱ्या बसचे टायर निखळून पडण्याच्या स्थितीत होते. वाहकाच्या लक्षात ही बाब त्वरित आल्याने त्याने बस थांबवल्याने बसमधील सुमारे आठ प्रवाशांचे जीव वाचले. बस थांबताच चालकाच्या मागील बाजूचे टायर निखळून पडले.
ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजता अजिंठ्याजवळील गोलटेक येथे घडली.

औरंगाबाद - यावल ही बस (एमएच २० बीएल १४०३) जात असताना गोलटेकजवळ बसचे मागचे टायर जळण्यासारखा वास येत होता. वाहक हकीम तडवी यांनी ताबडतोब घंटी वाजवून बस थांबवत प्रवाशांना खाली उतरवले. बस थांबताच टायर निखळून पडले. बस जर तशी पुढे गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
बातम्या आणखी आहेत...