आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात माथेफिरूने सेलू बसस्थानकात बस जाळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू- येथील बसस्थानकात परतूर आगाराची मुक्कामी असलेली बस (क्र. एमएच १४  बीटी ००७८) शनिवारी रात्री ८ ते ८.३०  च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. बसस्थानकातून येणाऱ्या धुराचा वास येत असल्याने काही तरुणांनी पाहिले तेव्हा बसने चांगलाच पेट घेतला होता. बसस्थानक परिसरात असलेल्या काही तरुणांनी पाण्याच्या साहाय्याने बसला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु बसने पेट घेतल्यामुळे व जळालेल्या बसमधून आवाज आल्यामुळे तरुण घाबरले. तोपर्यंत या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर टँकरने बस विझवण्यात आली. बसचे मोठे नुकसान झाले असून हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे मात्र समजू शकले नाही. 

दरम्यान शुक्रवारी जिंतूर परिसरात बसवर दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर सेलू शहरातील मुक्कामी येणाऱ्या बसेस पोलिस ठाण्यात लावण्यात आल्या होत्या. परंतु मुक्कामी येणाऱ्या बस बसस्थानकात आल्यावर पोलिस स्टेशनमध्ये खबरदारी म्हणून लावण्यात येत असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...