आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • By Election : Money Distributed To Voters In Latur

पोटनिवडणूक : लातुरात मतदारांना पैशांचे वाटप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - शहरातील प्रभाग क्र. 31 (अ) साठी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत पैसे वाटप होत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी एक लाख रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी पैसे वाटपाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे पैसे नेमके कोणाचे होते याचा शोध पोलिस घेत आहेत.


नगरसेविका रजिया वसीम शेख यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी काँग्रेसच्या संजीवनी जाधव व राष्ट्रवादीच्या दीपाली इंद्राळे यांच्यात लढत झाली.


दीड वाजता बालाजीनगरात पोलिसांनी संतोष नितनवरे यांच्या घरातून हजाराचे बंडल असलेले एक लाख रुपये जप्त केले. दोन्ही काँग्रेसनी पैसे आमचे नसल्याचे सांगत हात वर केले. राष्‍ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र इंद्राळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रशांत विलास जाधव व अन्य तिघे हे पैसे वाटप करीत होते. त्याला विरोध केला असता मारहाण करून पैसे नितनवरे यांच्या घरात टाकून ते पसार झाले. प्रशांत जाधव यांनी राजेंद्र इंद्राळे व संजय चलवाड यांच्याविरोधात अशाच स्वरूपाची फिर्याद केली असून त्यांनीही तोच आरोप केला आहे. त्यावरून दोन्ही गटांविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.