आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cage Lawyers Identified Assaulted; Proceeding Jam,

केजमध्ये वकिलास मारहाण; कामकाज ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज-केज वकील संघाचे सदस्य अॅड. बी. जी. नाईकवाडे यांना एका न्यायालयीन खटल्यामध्ये तडजोड प्रकरण निकाली निघाले नसल्याने न्यायालयाच्या आवारातच मारहाण केल्याची घटना साेमवारी (१० आॅगस्ट) घडली होती. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी केज व अंबाजोगाईच्या वकिलांनी कामकाजात सहभाग घेतला नाही.
केज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. अवघडे यांच्या न्यायालयासमोर सुरू असलेल्या एका प्रकरणात १० आॅगस्ट रोजी मनीषा आणि अशोक थोरात यांचे तडजोड प्रकरण निकाली निघाले नसल्याचा राग मनात धरून नाईकवाडे यांना साेमवारी न्यायालय आवारातच अशोक थोरात यांच्या नातेवाइकांनी बाचाबाची करून मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ संघाचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत वकिलांनी कामात सहभाग घेतला नाही, अशी माहिती अॅड. रणजित राख यांनी दिली.
आरोपींना शासन व्हावे
न्यायालयात वकिलांशी अरेरावी, मारहाणीच्या घटना घडतात. आरोपींना जोपर्यंत कठोर शिक्षा होणार नाही, तोपर्यंत अशा घटनांना लगाम बसणार नाही. अॅड. शरद लोमटे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. तालुका न्यायालयात कामात सहभाग घेतला नाही. सुभाष शिंदे, अध्यक्ष, वकील संघ