आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

.. तर हिंगोलीतील चार वसाहतींचा ‘कॅम्पा कोला’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - शहर विकास आराखड्यातील भूखंडांवर विकासकांनी अवैध प्लॉटिंग पाडून त्याची विक्री केली. या प्रकरणात खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेवर दोन महिन्यांत अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. नगर परिषदेच्या विरुद्धचे ठोस पुरावे आणि अनियमिततेसाठी नगर परिषदेला दिलेल्या नोटिसांमुळे चार वसाहतींवर बुलडोझर फिरवून त्या भागाचा ‘कॅम्पा कोला’ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहर विकास आराखड्याला 1994 मध्ये राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार मोकळे मैदान, सामाजिक सभागृह, शाळा, रुग्णालये आदींसाठी नगर भूखंड आरक्षित करण्यात आले. परंतु त्यानंतर नगर परिषदेने आपल्या हद्दीत विकासकांना प्लॉटिंग पाडू देण्यास हिरवी झेंडी दाखवली. विकासकांनी आरक्षणाच्या नियमांचे पालन न करताच नोटरीवर प्लॉट विकले. याबाबत माजी नगरसेवक तुकाराम झाडे यांनी नगर परिषदेच्या विरोधात सन 1997 मध्ये तेव्हाच्या परभणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती.

10 हजारांचा दंड
तत्कालीन जिल्हाधिकारी बलदेव सिंग यांनी पालिकेला नोटीस बजावली होती. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सिंग यांनी पालिकेकडून अनियमितता झाल्याचे शपथपत्र दिले. नंतर सुनावणीला हजर राहत नसल्याने 2000 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना 10 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

दोन महिन्यांत निकाल
या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून दोन महिन्यांत निकाल लागण्याची शक्यता आहे. निकाल नगर परिषदेच्या विरोधात गेल्यास शहरातील इंदिरानगर, खुशालनगर, साईनगर आणि आझम कॉलनी या भागातील घरांवर बुलडोझर फिरण्याची दाट शक्यता आहे.

न्यायालयाच्या निकालानंतरच पुढील निर्णय
या प्रकरणात मागील आठवड्यात सुनावणी झाली. दोन महिन्यांत अंतिम निकाल लागेल. शहर विकास आराखड्याचे नियम न पाळता भूखंड विकसित केले की नाही हा मुद्दा निर्णायक ठरेल. निकालानंतरच भूमिका घेणार आहे.
दिलीप चव्हाण, नगराध्यक्ष.