आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड: दोन कारची समोरासमोर जोरदार धडक, सहा जण ठार, नऊ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - माळाकोळी-लातूर मार्गावर बोरी तांड्याजवळ रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात पाच जणांचा जागीच तर उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. मृतांत चार पुरुष, एक महिला व एका मुलाचा समावेश आहे.
लोहा येथून अहमदपूरकडे जाणारी स्विफ्ट कार (एमएच १३ एसी ५३७७) व मौजे हिराबोरी फाटा (ता. अर्धापूर, जि.नांदेड) येथे समोरून येणारी इंडिगो कार (एमएच २४ व्ही ९०२८) यांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात स्विफ्टचा चालक दिलीप शिवाजी सोनवळे (२९), इंडिगोचा चालक संतोष शिवाजी डोंगरे (४२), कारमधील सीमा जोंधळे (१२), मन्मथ बापूराव सोनवळे (३२), दिलीप सूर्यवंशी (३६), अरुण जोंधळे (३९) यांचा मृत्यू झाला. नऊ जण जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...