आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबिजेसाठी बहिणीकडे जाणार्‍या भावाचा कार अपघातात मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- जिंतूर ते औरंगाबाद रस्त्यावर पिंप्री गावाजवळ गुरुवारी रात्री कार पुलावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. नवनाथ मुंजाजी वैधे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते भाऊबिजेसाठी बहिणीला आणण्यासाठी जिंतूरला जात असताना हा अपघात घडला.

आडगाव लासिना (ता.पूर्णा) येथील रहिवासी असलेले नवनाथ वैधे हे पुणे येथून गुरुवारी सायंकाळी जिंतूरकडे कारने (एम.एच. १४- सीसी ६६७३) जिंतूरकडे निघाले होते. औरंगाबाद-जिंतूर रस्त्यावर जिंतूरपासून जवळच असलेल्या पिंप्री या गावाजवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावर जोरदार आदळून पुलाखाली पडल्याने नवनाथ वैधे यांचा जागीच मृत्यू झाला. अंधारात ही गाडी पडल्याने कोणालाही दिसत नव्हती. याच दरम्यान चारठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुंगळे, देवकर, हेडकॉन्स्टेबल जाधव, कॉन्स्टेबल साठे हे रात्रीची गस्त घालत असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी कारचालक नवनाथ वैधे यांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर वजीर यांचे ते मेहुणे होत. या प्रकरणी जिंतूर पोलिसांत नोंद झाली आहे.