आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवर जीप आदळून पत्नी ठार, पती जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- कर्नाटकहून बुलडाणा जिल्ह्यातील चिखली गावाकडे जाणाऱ्या दांपत्याच्या कारला भरधाव जीपने धडक दिली. या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला. बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील पारगाव येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हा अपघात घडला. दिवाळीच्या सुट्यांमध्ये हे दांपत्य गावी निघाले होते. रेणुका अविनाश जवरे (रा. चिखली, जि. बुलडाणा) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.

अविनाश वसंतराव जवरे हे कर्नाटकमधील एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला असून दिवाळीच्या सुट्या लागल्याने शुक्रवारी पत्नी रेणुकासह ते कारने चिखलीकडे निघाले होते. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगावजवळ त्यांच्या कारला (एमएच २८, एएन १५१७) समोरून येणाऱ्या जीपने (एमएच २५, ४१३५) जोराची धडक दिली. या अपघातात रेणुका जवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश हे गंभीर जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...