आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार झाडावर आदळून एक ठार, सात जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तेलंगणा येथील साई भक्तांच्या कारला अपघात होऊन एकजण ठार तर सातजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.27) सकाळी सात वाजेच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील आळणी पाटीजवळ घडला.
तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील गोदमकुटा येथील रेड्डी कुटुंबीय त्यांच्या नवीन कारमधून (तात्पुरता क्रमांक एपी -10 व्हीईटीआर -7212) शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. त्यांची कार आळणी पाटीजवळील वळणावर पोहोचली असता चालक मधुसूदन रेड्डी यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती चालकाच्या बाजूने रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळली. यामध्ये गोपालरेड्डी रामरेड्डी यांचा मृत्यू झाला. तर चालक मधुसूदन रेड्डी, शोभा रेड्डी, मंजुला रेड्डी, शारदा रेड्डी, याक्षा रेड्डी, विश्ववर्धन रेड्डी व भुवन रेड्डे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास बीट अंमलदार ए. एस. हुंडेकरी करत आहेत.
(फोटो - भरधाव कार झाडावर आदळून आळणी पाटीजवळ अपघात घडला.)