आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यामध्‍ये कारला लागलेल्या आगीत माय-लेकीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - डोंगरकिन्ही-नातलगाच्या लग्नासाठी नगरमार्गे बीडला येताना पुण्याच्या घोडके कुटुंबाच्या ओम्नी कारला आग लागून मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत बाप-लेक गंभीर भाजले. ही घटना गुरुवारी पहाटे 3.30 वाजता डोंगरकिन्हीजवळ (ता. पाटोदा) भाटेवाडी तलावालगत घडली. एलपीजीवरील ओम्नीत वायरमधून धूर निघाल्याने ही आग लागल्याचे चौकशीत समोर आले आहे.


पुण्याच्या बिबवेवाडी येथील स्टेशनरी दुकानमालक ज्ञानेश्वर बाबूराव घोडके बुधवारी रात्री 7 वाजता ओम्नीने (एम.एच.-14 एएम-239 ) पत्नी सुनीता (30), मुलगा श्रीदीप (12), मुलगी दीपश्री (9) यांच्यासह बीडला येत होते. नगरला रात्री 11 वाजता त्यांनी एका ढाब्यावर जेवण केले. तेथून येताना कारच्या वायरमधून धूर निघत असल्याचे पाहून ज्ञानेश्वर मुलगा श्रीदीपला घेऊन खाली उतरले. तेवढ्यात कारने पेट घेतला. यात मागील सीटवरील सुनीता व दीपश्रीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. दोघींना वाचवण्यासाठी ज्ञानेश्वर यांनी प्रयत्न केले, पण यश आले नाही. अपर पोलिस अधीक्षक माधव कारभारी, पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
मदतीला कोणी धावले नाही


दुर्घटनेनंतर ज्ञानेश्वर यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, पण एकही वाहन थांबले नाही. अखेर मुलाला घेऊन बसने त्यांनी चुंभळी फाटा गाठला. सौताडा येथील त्यांच्या मेहुण्याला दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलाला सौताडा येथून सोडून ज्ञानेश्वर यांनी जामखेडला गेले. तेथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

तंत्रज्ञांना पाचारण

ओम्नीला कोणत्या कारणाने आग लागली याची माहिती घेण्यासाठी टेक्निकल तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांक डून तपासणी करण्यात आली. टाकीतील गॅस गाडीत पसरून वायरमध्ये स्पार्क झाल्याने ही घटना घडल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधीक्षक, बीड