आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या नगरसेवकाकडून दुष्काळग्रस्तांना दिवाळीच्या साहित्याचे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पुणे येथील भाजपचे नगरसेवक दिलीप काळोखे यांच्या वतीने गुरुवारी निलंगा येथे दुष्काळग्रस्त २०० कुटुंबीयांना साखरेपासून ते आकाशदिव्यापर्यंत दीपावलीचे साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आहे. ही गरज लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे पुण्याचे नगरसेवक दिलीप काळोखे यांनी साखर, तांदूळ, तेल, रवा, उटणे, आकाशदिवे, फटाके आदी साहित्य वाटप केले. या वेळी निलंगेकर म्हणाल्या, संकट कितीही मोठे आले तरी त्यास घाबरून न जाता दोन हात करून जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संकटप्रसंगी घरातील महिलांनी पुढे येऊन सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी संकट आले म्हणून आत्महत्या करू नये किंवा तसा प्रयत्नही करू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. नगरसेवक दिलीप काळोखे यांनी सुमारे १ कोटी रुपयांचे साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांना निलंगेकर यांनी धन्यवाद दिले.
बातम्या आणखी आहेत...