आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांची माहिती गोळा करण्‍यास नकार, बीडमध्‍ये 6 शिक्षकांवर गुन्‍हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- घरोघरी भेटी देऊन मतदारांची माहिती गोळा करण्‍यास नकार दिल्‍यामुळे शिरुर तालुक्‍यातील जिल्‍हा माध्‍यमिक शाळेच्‍या 6 शिक्षकांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहे. शिरुर तहसीलदारांच्‍या आदेशाने हे गुन्‍हे दाखल करण्‍यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांची माहिती गोळा करण्याची मोहीम राबविण्यात आली. यासाठी शासनातर्फे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्‍हणून शिक्षकांची नेमणुक केली जाते व त्‍यांच्‍याचमार्फत ही माहिती गोळा केली जाते. या कामासाठी शिरूर तालुक्यातील खोकरमोह येथील जिल्हा माध्यमिक शाळेतील सहशिक्षक बाळासाहेब एकनाथ पवार, अतूल रमेश मुळे, अनिल विश्वनाथ काळे, येथील प्राथमिक कन्या शाळेतील सहशिक्षक भागवत किसन सिरसाट, रामेश्वर आसाराम गोसावी आणि हिवरसिंगा प्राथमिक शाळेतील सहशिक्षक एस.के. सानप या 6 शिक्षकांची तहसील कार्यालयाकडून नियुक्‍ती करण्‍यात आली होती. तसे लेखी आदेश या शिक्षकांना देण्‍यात आले होते. मात्र या शिक्षकांनी हा आदेश स्‍वीकारण्‍यास नकार दिला व हे काम केले नाही. त्‍यामुळे तहसीलदारांच्‍या आदेशाने या 6 शिक्षकांवर लोक प्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम 134, 188 नूसार गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.   

बातम्या आणखी आहेत...