आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसमत येथे कारमधून १५ लाखांची रोकड जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - रविवारी दुपारी दीडच्या सुमारास नांदेडहून वसमतकडे येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारमधून आचारसंहिता पथकाने रद्द करण्यात आलेल्या हजार रुपयांच्या नोटा असलेली तब्बल १५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. वसमत-नांदेड रस्त्यावर जिंतूर टी पॉइंटवर वाहनांची तपासणी करीत असताना वसमत नगर परिषदेच्या आचारसंहिता पथकाने ही कारवाई केली आहे.
या वेळी वसमत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद हे स्वतः हजर होते. काशीद यांनी एमएच ३१- सीएक्स- २७२७ या क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार अडवून तपासणी केली असता मागच्या सीटवर थैलीत बांधून ठेवलेली रक्कम आढळली. १५ लाखांच्या या रकमेत रद्द करण्यात आलेल्या १००० रुपयांच्या नोटा आहेत. याबाबत पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे.
बातम्या आणखी आहेत...