आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व जिल्ह्यांत उद्यापासून जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज देऊन सतत पाठपुराव्यासाठी थेट अाैरंगाबादचा हेलपाटा मारावा लागत होता. त्यामुळे वेळेबरोबरच पैसे खर्च होऊन मनस्ताप सहन करावा लागत होता. अशा तक्रारी वाढू लागल्याने राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात विशेष जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मराठवाड्यातील अाैरंगाबाद, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांत जातप्रमाणपत्र पडताळणी पथक कार्यान्वित हाेणार अाहे, अशी माहिती समितीचे विभागीय उपायुक्त पी. बी. बच्छाव यांनी दिली.
जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या नगरसेवकांना जात प्रमाणपत्र पडताळणीस उशीर हाेऊ लागल्याने त्यांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार फिरू लागली आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अडचणींना सामाेरे जावे लागत हाेते. काही जणांचे प्रमाणपत्रही मिळाल्याने लाभधारकांकडून समाधानही व्यक्त केले जात असे, परंतु ग्रामीण भागातून अाैरंगाबाद येथे जाण्यासाठी लागणारा वेळ, पैसा टाळण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर जातप्रमाणपत्र पडताळणी समिती पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.
यासाठी शासनाने जिल्हानिहाय जातप्रमाणपत्र पडताळणी समित्यांकरिता नव्याने निर्माण करण्यात अालेल्या पदांकरिता दाेन काेटी ६३ लाख रुपयांच्या वार्षिक खर्चासही मान्यता दिल्याचे शासनाचे उपसचिव ज्ञा. ल. सूळ यांनी अध्यादेशामध्ये स्पष्ट केले अाहे.
अशी जिल्हानिहाय समिती
मराठवाड्यातील जिल्ह्यांत डाॅ. बाबासाहेब अांबेडकर सामाजिक न्याय भवनातील कार्यालयांत अशा समिती साेमवारपासून कार्यान्वित हाेणार अाहेत. यामध्ये अाैरंगाबाद (शिवाजी हायस्कूलशेजारी खाेकडपुरा), जालना (जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर), परभणी (कारेगाव राेड, जायकवाडी वसाहत), बीड (तहसील कार्यालयाजवळ, नगर राेड) येथे समिती पथक असून जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज देणे शक्य हाेणार अाहे.
टाेल फ्री क्रमांकावर करा संपर्क
अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांपैकी ज्यांनी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला अाहे, त्या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी संबंधितांनी १८००२३३०४४४ या टाेल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच वैध प्रकरणांची माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाणार अाहे.
- व्ही. अार. मुंडे, संशाेधन सहायक, िवभागीय समिती
बातम्या आणखी आहेत...