आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जात प्रमाणपत्राचे अधिकार सरपंचांना द्या’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- जात व रहिवासी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार गावपातळीवरील सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने प्रभारी तहसीलदार एन. बी. उपाध्ये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या निकालास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी तसेच भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेले जात, रहिवासी प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून काढावे लागते. जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी एका व्यक्तीला साधारण पाचशे रुपये खर्च येतो. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांना ते खर्च करणे आवाक्याबाहेर आहे. त्यासाठी विशेष अधिकार बाब म्हणून तात्पुरते शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यापुरते सरपंच व ग्रामसेवक यांना जातीचे, रहिवासी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार द्यावा. जेणेकरून सर्वांचे सोयीचे व विनाखर्चाने काम होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रेखा पाटे, तालुका उपाध्यक्ष महादू चव्हाण, सुनील मोकासे, बळीराम पवार, गोरख काळे, सर्जेराव काळे, बादल त्रिभुवन, जयवंत कुलकर्णी, प्रशांत मोहिते आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.