आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यातील चालुक्यकाळाची प्राचीन गणरायाची शिल्पे दुर्लक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगावजवळच्या केसापुरी परिसरातील महादेवाच्या प्राचीन मंदिरात नृत्य करणारे हे गणेशशिल्प आहे. गणपतीच्या उजव्या दोन हातात शस्त्र आहे. - Divya Marathi
माजलगावजवळच्या केसापुरी परिसरातील महादेवाच्या प्राचीन मंदिरात नृत्य करणारे हे गणेशशिल्प आहे. गणपतीच्या उजव्या दोन हातात शस्त्र आहे.
बीड - जिल्ह्यातील नामलगावचा आशापूरक, लिंबागणेशचा भालचंद्र, राजुरीचा नवगण ही गणपती मंदिरे श्रद्धास्थाने आहेत. ती महाराष्ट्रात परिचित व प्रसिद्ध आहेत; परंतु प्राचीन काळापासून असलेल्या गणेशाच्या मूर्ती दुर्लक्षित आहेत. दहा ते अकराव्या शतकापासून ते यादवकाळापर्यंत काही प्राचीन मंदिरांवरील गणेशमूर्ती विलोभनीय असून या मूर्तिकला पाहताना तिची वैशिष्ट्ये व प्राचीनत्वाची खात्री पटतेच व पाहणाराही अचंबित होतो.
जिल्ह्यातील प्राचीन मंदिरातील या शिल्पांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले असले तरी स्थानिक नागरिकांनी संस्कृतीचा ठेवा जतन करण्याची गरज असल्याचे इतिहास अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांनी सांगितले.

पिंपळनेरचा बारवेमधील गणेश
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील बारवेतील गणेश वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. स्थापना बारवेत केली असून बारव निर्मितीनंतर ही स्थापना आहे. याच गावाच्या पूर्वेला दुसरा एक गणपती अाहे. ही मूर्ती सर्वात उंच प्राचीन गणपती म्हणून पाहता येईल. तसेच बेसॉल्ट दगडातील ही मूर्ती आजूबाजूला प्राचीन देवालय नसतानाही कशी आली हे आश्चर्यकारक आहे.

नर्तनावस्थेत स्थिर गणेशशिल्प
अंबाजोगाईजवळ यादवकालीन अमलेश्वराचे मंदिर हेमाडपंतीचा अप्रतिम नमुना अाहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर यवनिका, लावण्यवती, शलभंजिका शिल्पे असून या शिल्पसमूहात नर्तन करणाऱ्या गणेशाचे लोभसवाणे शिल्प आहे, परंतु इथला गणपती केसापुरीप्रमाणे नर्तनरत नसला तरी तो मूर्तीप्रमाणे नर्तनावस्थेत स्थिर आहे.
गणेशाचे भरतनाट्यम
माजलगाव तालुक्यातील केसापुरीपासून जवळच प्राचीन महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या नृत्यशाळेच्या छतावर नर्तन करणाऱ्या गणपतीचे अप्रतिम उठावदार शिल्प असून ते दहाव्या ते अकराव्या शतकात कोरलेले आहे. या नृत्य गणपतीची पारंपरिक प्रतिमा पाहता ती प्राचीन मुद्रा असून केसापुरीचा हा गणेश पुरावा आहे. डाव्या पायावर भार देऊन हा गणेश भरतनाट्यम शैलीत वक्राकार आहे. त्याची सोंड डाव्या बाजूला सरळ जाऊन नर्तनाला साजेल अशी डोलते.
पुढील स्लाइड्सवर पाहा.