आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदनसावर गावजवळ तिहेरी अपघात, ओव्हरटेक भोवला, भरधाव जीप बैलगाडीनंतर ट्रकवर आदळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज : बैलगाडीला धडक देऊन पुढे जाणारी जीप समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने ट्रक उलटला. या अपघातात बैलगाडी चालक शेतकरी जखमी झाला असून त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता केज - अंबाजोगाई मार्गावरील चंदनसावरगावजवळ हा तिहेरी अपघात घडला.

केजहून जीप (एमएच २२ - ७०७०) ही अंबाजोगाईकडे निघाली होती. मार्गावर चंदनसावरगावजवळ समोर चालत असलेल्या बैलगाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जीपने सुरुवातीला बैलगाडीला जोराची धडक दिली. यानंतर अंबाजोगाईहून कापूस भरून केजकडे निघालेल्या ट्रकवर (एमएच ०४ डीडी २३७१) जीप आदळली.
या अपघातात बैलगाडीला जोरात धडक बसल्याने शेतकरी मदन ज्ञानोबा तपसे (४५, रा. चंदनसावरगाव, ता. केज) हे जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर ट्रक
केज - अंबाजोगाई मार्गावर उलटल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
अपघातानंतर पाच जण पसार परळी तालुक्यातील दोन तरुण व तीन तरुणी जीप घेऊन बाहेरगावी फिरायला गेले होते. चंदनसावरगाव येथे जीपचा अपघात घडल्यानंतर पाच जणांनी अपघातस्थळावरून पळ काढला.
बातम्या आणखी आहेत...