आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रभागा आली गोरोबाकाकांच्या भेटीला; दुष्काळात दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - बहुप्रतीक्षित उजनी योजनेचे पाणी आज (दि.4) उस्मानाबाद शहरात पोहोचले आहे. उस्मानाबाद शहरवासीयांच्या दृष्टीने हा सुवर्णदिन असून, ऐन दुष्काळाच्या काळात जणू साक्षात संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या भेटीला चंद्रभागा आली आहे. चंद्रभागेचे पाणी पाहण्यासाठी उस्मानाबादकर कमालीचे आतुर झाले होते.

कायम पाणीटंचाई असलेले उस्मानाबाद शहर उजनीचे पाणी येण्याच्या बातमीने अक्षरश: भारावून गेले आहेत. अडीच वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या उजनीच्या पाण्याचा प्रवास पंधरा दिवसांपासून चाचणीच्या माध्यमातून उस्मानाबादच्या दिशेने सुरू आहे. या पाण्याने सोमवारी सकाळी बार्शी तालुक्यातून उस्मानाबाद तालुक्यात आगमन केले. सायंकाळी तालुक्यातील कौडगाव येथे पाणी पोहोचल्यानंतर सर्वांच्याच चेह-यावर समाधान फुलून आले.

गेल्या काही वर्षांपासून केलेल्या कष्टाची आठवण या निमित्ताने झाली. राष्‍ट्रवादीचे युवा नेते, माजी राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कौडगाव येथे जलपूजन करून त्यानंतर हातलादेवीला चंद्रभागेच्या पाण्याने जलाभिषेक केला. या पाण्याचा प्रवास रात्री दहा वाजता उस्मानाबाद शहरानजीक असलेल्या खानापूरपर्यंत झाला होता. मंगळवारी सकाळी चाचणीचे हे पाणी शहरात पोहोचणार आहे. त्यानंतर ख-या अर्थाने चाचणीचा संपूर्ण टप्पा यशस्वी होईल. ऐन दुष्काळात शहरासह परिसरातील अनेक गावांवरील जलसंकट टळणार आहे.