आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतसंस्थेस बनावट धनादेश दिल्याप्रकरणी 60 हजारांचा दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - ज्ञानेश्वर पतसंस्थेस कर्ज फेडीकरिता बनावट धनादेश दिल्याच्या आरोपावरून परळी न्यायालयाचे न्यायाधीश एच.जे. पठाण यांनी आरोपीस एक महिना तुरुंगवासाची व साठ हजारांचा दंड ठोठावला आहे. परळी येथील ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेकडून आरोपी सुधाकर खोकले यांनी आठ डिसेंबर 2007 रोजी साठ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परत फेडीकरिता त्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बॅँकेचा 30 हजार रुपयांचा 25 मे 2009 ला धनादेश दिला होता.

तो धनादेश न वटल्यामुळे पतसंस्थेचे प्राधिकृत अधिकारी बालाजी भोयटे यांनी सुधाकर खोकले यांच्या विरुद्ध परळी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात वैद्यनाथ बॅँकेचे शाखाधिकारी उत्तम जोशी व उस्मानाबाद जनता बॅँकेचे शाखाधिकारी मगर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानुसार न्यायाधीश पठाण यांनी एक महिना तुरुंगवासाची व साठ हजारांचा दंड ठोठावला आहे. ज्ञानेश्वर पतसंस्थेतर्फे अँड. आर. व्ही. गित्ते यांनी न्यायालयात बाजू मांडली.