परळी - उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नेल्याने आमदार धनंजय मुंडेंसह पकंजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उमेदवारांनी त्यांच्याबरोबर केवळ चार जणांनाच बरोबर न्यावे, अशा निवडणूक अधिका-यांच्या सूचना आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासमवेत पाचपेक्षा अिधक कार्यकर्त्यांना कक्षात नेले, तर धनंजय मुंडे यांच्याबरोबरही पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते होते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याने तहसीलदार अतुल जटाळे यांनी परळी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार व इतर चार जणांनाच प्रवेश देण्यात येतो; मात्र धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी जास्त लोक सोबत आणले होते. त्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग झाल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार अतुल जटाळे यांनी दिली.
पुढे वाचा लोकसभेसाठी डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी अर्ज दाखल...