आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी देण्यासाठी चढाओढ; पालकांचा गराडा, पोलिस पाचारण, उशिराच्या धास्तीने विद्यार्थी पळाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाेलिसांनी पालकांना बाहेर काढल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा हाॅलमध्ये अशा प्रकारे पळत जावे लागले. छाया. दीपक जवकर - Divya Marathi
पाेलिसांनी पालकांना बाहेर काढल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा हाॅलमध्ये अशा प्रकारे पळत जावे लागले. छाया. दीपक जवकर
बीड- दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर सोडवण्यासाठी आलेले पालक केंद्राबाहेर जात नसल्याचे पाहूण केंद्र प्रमुखांनी पोलिसांनाच पाचारण केल्याचा प्रकार बीड शहरातील डॉ. बापूजी साळंुके हायस्कूलमध्ये घडला. पोलिस आल्यांनतर पालक केंद्राबाहेर गेले परंतु पोलिसांना पाहून विद्यार्थी मात्र गोंधळून गेले. या गोंधळात पेपर सुरू होण्यास केवळ दहा मिनिटे राहिल्याने विद्यार्थ्यांनी पळत परीक्षा हॉलकडे धाव घेतली.
 
मंगळवार पासुन दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली. जिल्ह्यात १४३ केंद्रावर ४३ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षा देत अाहेत. बीड शहरातील डाॅ. बाबुजी साळुंखे हायस्कुलमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून गेट उघडण्यात आले होते. हे पाहुन विद्यार्थी पालक हळूहळू केंद्रात गर्दी करू लागले. परिक्षा केंद्रात गर्दी होत असल्याचे पाहुन शाळेतील शिपायाबरोबर शिक्षकांनी पालकांना केंद्राबाहेर जाण्याची विनंती केली. परंतु पालकांनी याला विरोध केला. केंद्रात गर्दी वाढत असल्याचे पाहुण केंद्र प्रमुखांनी गर्दी हाटवण्यासाठी थेट बीड शहर पाेलिसांना केंद्रावर पाचारण केले. 

पोलिसांनी तातडीने केंद्रावर येत पालकांना दम दिला.पोलिस आल्याचे पाहुन काही वेळाने पालक केंद्राबाहेर पडले. तर दुसरीकडे मराठीचा पेपर सुरू हाेण्याच्या दहा मिनीट अगोदर शाळेच्या िशपाईने घंटा वाजवली. पेपर सुरू हाेण्याच्या एैन वेळेवर विद्यार्थ्यांना परिक्षा हाॅलमधील त्यांचे बैठक क्रमांक कसे शाेधायचे हा प्रश्न उभा राहीला. त्यातच सकाळी साडेदहा वाजेपर्यंत वर्ग खोल्या बंद होत्या. काही विद्यार्थी तर पेपर सुरू होण्यास दहा मिनीटे शिल्लक राहिल्याने केंद्रात थेट परिक्षा हॉलच्या दिशेने पळत सुटले. परिक्षा केंद्रप्रमुखांनी वेळेवर पेपर सुरू केला. परीक्षेच्या पहिल्याच पेपरला केंद्रावर पाेलिस अाल्याने विद्यार्थ्यांची तारंबळ उडाली. पाेलिसांचा बंदाेबस्त कायम ठेवला. 

तपासणी पथके स्थापन 
जिल्ह्यातीलदहावीच्या १४३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी तालुकानिहाय पथके स्थापन करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी मोहन काकडे यांनी सांगितले. 

माहिती घेतली जाईल 
डाॅ. बापुजी साळुंखे हायस्कुल चा शैक्षणिक दर्जा याेग्य अाहे. परंतु परीक्षा काळात पालकांनी गर्दी केल्याने काय घडले ? याची माहिती घेतली जाईल. त्यानुसार अन्य केंद्रांनाही सूचना िदल्या जाणार अाहेत. 
- व्ही.एस. सारुक, िशक्षणाधिकारी माध्यमिक 

पालकांना शिस्त नाही 
परीक्षाकेंद्र परिसरातून पालकांना बाहेर काढण्यासाठी पाेलिसांना यावे लागले म्हणजे पालकांना िशस्त नाही हे स्पष्ट हाेते. पालकांनी पाल्यांना अािशर्वाद देऊन परीक्षेला साेडावेत, थांबू नये. 
- शशीकांति हंगाेणेकर, िशक्षणाधिकारी. 

पालकांनी गर्दी केली 
परीक्षाकेंद्रावरपालकांना येण्यास अामचा विराेध नाही. परंतु त्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे अाहे. विद्यार्थ्यांना साेडल्यानंतर त्यांनी शाळेच्या परिसरात थांबू नये. त्यांना बाहेर काढले वेळेत पेपर सुरू केला. 
- डी.एल. मिर्झा बेग, केंद्र प्रमुख 

पुढील स्लाइडवर वाचा कॉपी देण्यासाठी चढाओढ...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...