आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्राच्या नावे परीक्षा, दोघांवर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देत असलेल्या तोतया परीक्षार्थी व त्याच्या मित्राला पर्यवेक्षकांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर हा प्रकार आढळला. रामदास दगडू पवार (२१) आणि सलीम बागुलाल शेख (२८) अशी आरोपींची नावे आहेत.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू अाहेत. रामदास पवारच्या हाॅलतिकिटावर सलीम शेख याने स्वत:चे छायाचित्र लावून त्यावर प्राचार्यांचा शिक्का आणि स्वाक्षरी घेतली होती. शुक्रवारी बीए प्रथम वर्षाचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. या वेळी पर्यवेक्षक भास्कर रेड्डी सत्यनारायण रेड्डी यांनी हॉलतिकीट तपासले असता पवारच्या नावावर शेख परीक्षा देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.