आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujabal And Kirit Somaia News In Marathi

छगन भुजबळांची सोमय्यांना नोटीस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपली बदनामी झाल्याबद्दल भाजपचे नेते व ईशान्य मुंबईतील उमेदवार किरीट सोमय्या यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप तत्काळ मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा 100 कोटी नुकसान भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सोमय्या यांनी भुजबळांवर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. काही कंपन्या, नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन तसेच मुंबईतील शासकीय भूखंडावर अफरातफर करत भुजबळ तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी हजारो कोटींची मालमत्ता जमा केली.

मात्र आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून सर्व प्रकल्पांना नियमांनुसार आपण परवानगी दिली होती. मात्र निवडणुका लक्षात घेऊन सोमय्यांनी आपली बदनामी केली असून 48 तासांत त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी व दिवाणी खटले दाखल करण्यात येतील, असे भुजबळांनी नोटीसीत म्हटले आहे.