आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआरसह मुख्य लिपिक एसीबीच्या जाळ्यात; सापळा रचून केले गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- संस्थेच्या नावाला मान्यता देऊन बँकेत खाते उघडण्यासाठी बँकेला पत्र देण्याकरिता तक्रारदाराकडे अनुक्रमे ५ हजार व २ हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारल्यानंतर उस्मानाबादच्या सहकार विभागाच्या सहायक निबंधकासह मुख्य लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी (दि. ११) दुपारी सेंट्रल बिल्डिंग येथील सहायक निबंधक कार्यालयात करण्यात आली.   

उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथील नियोजित सावित्रीबाई फुले गारमेंट को. ऑप. इंडस्ट्रीज, सोसायटीच्या वतीने संस्थेच्या या नावास मान्यता मिळावी तसेच बँकेत संस्थेच्या नावे खाते उघडण्यासाठी सहायक निबंधक या नात्याने बँकेला पत्र द्यावे याकरिता संस्थेच्या मुख्य प्रवर्तकांनी अर्ज देऊन संस्थेच्या नोंदणीचा मूळ प्रस्ताव सहायक निबंधकांकडे सादर केला होता,  परंतु सहायक निबंधक हनुमंत परमेश्वर कांबळे व मुख्य लिपिक दत्तात्रय संदिपान पवार या दोघांनी या कामासाठी २५ एप्रिल रोजी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाकडे २० हजार रुपयांच्या लाचेच्या मागणी केली होती. यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्याकडे संपर्क साधला. त्यानुसार गावडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर गुरुवारी (दि. ११) दुपारी सेंट्रल बिल्डिंग येथील सहायक निबंधक कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदार सहायक निबंधक कांबळे व मुख्य लिपिक पवार यांना भेटले असता दोघांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले. 
 
बातम्या आणखी आहेत...