आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chief Minister Chavan Like Goat, Ajit Power Suffered Fearing Uddhav Thakare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री चव्हाण शेळपट; अजित पवारांना झालाय भस्म्यारोग - उध्‍दव ठाकरेंचे टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - पृथ्वीराज चव्हाण शेळपट आहेत, तर अजित पवार यांना भस्म्यारोग झाला, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हदगाव येथे आयोजित बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. शिवपार्वती मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला.

सुभाष देसाई, खा. सुभाष वानखेडे, सुहास सामंत, जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे प्रामुख्याने उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, यापुढे मोठे प्रकल्प घेऊ नयेत असे केंद्राचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने नवे नियमही केले आहेत. असे असताना टगेगिरी करणार्‍या अजित पवारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मोठय़ा प्रकल्पाची फाइल मुख्यमंत्र्यांना काढायला सांगितली. शेळपट मुख्यमंत्र्यांनी ते प्रस्ताव मंजूर केले. आता हे प्रस्ताव राज्यपालाच्या सहीसाठी पाठवण्यात आले आहेत. केंद्राचे निर्देश असतानाही पवारांनी मोठे प्रकल्प करण्याचा अट्टहास का धरला? याचे कारण त्यांना माहिती आहे. या प्रकल्पात पैसा पुष्कळ मिळतो. त्यांना भस्म्यारोग झाला आहे. कितीही खाल्ले तरी दर तासाला भूक लागते. तशी त्यांची अवस्था झाली. 70 हजार कोटी सिंचनावर खर्च होऊनही दुष्काळ कायम असल्याचे ते म्हणाले.


मोदींना विरोध नाही
नरेंद्र मोदी यांना विरोध नाही. केवळ पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवताना तो एनडीएतील सर्व पक्षाच्या संमतीने ठरवला जावा एवढीच आपली भूमिका होती. भाजपतील काही नेत्यांचा मोदींना विरोध असल्याचे चित्र रंगवले जात आहे, परंतु मला ते खरे वाटत नसल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. मेळाव्यानंतर वानखेडे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांना शेळपट म्हणाल्याचे सर्मथनही त्यांनी केले.

सत्ता आल्यानंतर विदर्भाचे काय ते पाहू
सध्या शिवसेना-भाजप युती समोर देश काँग्रेसमुक्त करणे हे एकमात्र उद्दिष्ट आहे. भाजपचा विदर्भाला पाठिंबा असला तरी त्यांनीही प्रथम प्राधान्य काँग्रेसमुक्तीला दिले आहे. युतीचे शासन आल्यानंतर स्वतंत्र विदर्भाचे काय ते पाहू, असे ठाकरे म्हणाले.