आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार हे भगवानगडाचेच, मुख्यमंत्री फडणवीस, गडासाठी 3.5 कोटी निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- भगवानगडाला जागतिक कीर्तीचे स्थळ बनवण्याचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करणार आहे. राज्य सरकार हे भगवानगडाचे सरकार आहे. गडाच्या विकासासाठी मागितले ते सर्व सरकारकडून दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या वेळी त्यांनी साडेतीन कोटी रुपये निधी वितरणाचे पत्रही दिले.
श्रीक्षेत्र भगवानगडावर भगवान बाबांच्या समाधी सुवर्ण महोत्सवाची सांगता मंगळवारी झाली. या वेळी फडणवीस बोलत होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गडाचे महंत नामदेवशास्त्री, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री राम शिंदे, मोनिका राजळे, भीमराव धांडे, महेश मोतेवार उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, समाजाला दिशा देण्याचे काम भगवानबाबांनी केले आहे. भगवानगडाचे सरकार राज्यात असल्याने या गडाच्या विकासाला सातशे कोटी रुपये लागले तरी देऊ. सात कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यापैकी साडेतीन कोटी रुपये मंजूर करून निधी वितरणाचे पत्र मी आणले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.