आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना मुंबईत नकाेय मराठा माेर्चा, निमंत्रण देऊन अायाेजकांकडून झाली काेंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक | काेपर्डीच्या अाराेपींना फाशीची शिक्षा द्या, आरक्षण द्या व अॅट्राॅसिटी रद्द करा  या मागण्यांसाठी लाखो मराठा बांधवांनी शनिवारी नाशिकमध्ये अतिविराट माेर्चा काढला. माेर्चाचा सहा किलाेमीटरहून अधिक अंतराचा मार्ग मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेला हाेता. - Divya Marathi
नाशिक | काेपर्डीच्या अाराेपींना फाशीची शिक्षा द्या, आरक्षण द्या व अॅट्राॅसिटी रद्द करा या मागण्यांसाठी लाखो मराठा बांधवांनी शनिवारी नाशिकमध्ये अतिविराट माेर्चा काढला. माेर्चाचा सहा किलाेमीटरहून अधिक अंतराचा मार्ग मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेला हाेता.
मुंबई - राज्यभरात अालेली मराठा मोर्चांची सुनामी मुंबईत येऊन धडकू नये आणि मराठा समाजाने मुंबईत मोर्चा काढू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्नांचा आटापिटा चालवला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांना या मोर्चास संबोधित करण्याचे निमंत्रण देऊन आयोजकांनीही त्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे.

मुंबईतील मोर्चात किमान ५० लाखांची गर्दी जमेल, अशी शक्यता असल्याने तो टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न चालविले आहेत. दिवाळीपूर्वी हा मोर्चा शिवाजी पार्कवर करण्याचे नियोजन आहे. राज्यभरात सध्या मराठा मूक मोर्चांची लाट आली आहे. २० लाखांहून अधिक लोक अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांच्या मोर्चात सामील झाले. या मोर्चांमुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे मोर्चे आपल्याचविरुद्ध वाटत आहेत. मुंबईच्या मोर्चात ५० लाख लोक सामील झाले आणि अचानक काही उद्रेक झाला किंवा आपत्ती घडली तर कायदा- सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो व असे झाल्यास आपला राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे.
पुढे वाचा...
> मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांकडून खतपाणी
>मराठा मंत्री, आयोजकांशी गुप्त खलबते
>मराठा एकी दाखवायचीच
>मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
>गर्दीचे दावे
बातम्या आणखी आहेत...