आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी रद्द करण्यास मुख्यमंत्र्यांची तत्त्वत: मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- राज्यात एलबीटी रद्द करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती व्यापारी शिष्टमंडळाचे सदस्य हर्षद शहा यांनी बुधवारी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेमच्या (फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्र) शिष्टमंडळासोबत सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथिगृहात एलबीटीबाबत चर्चा केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व फेमचे अध्यक्ष मोहनभाई गुरनाणी यांनी केले.
राज्यातील महानगरपालिकांमध्ये लावण्यात आलेला एलबीटी तातडीने रद्द करावा, या कराचा भरणा करण्यासाठी महापालिकांतर्फे व्यापा-यांना जो त्रास दिला जात आहे तो तातडीने बंद करावा, एलबीटी रद्द करण्यासाठी राज्यात जी आंदोलने झाली, त्यासंदर्भात व्यापा-यांवर काही ठिकाणी जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे तातडीने रद्द करावेत, अशा प्रमुख मागण्या व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने केल्याची माहिती शहा यांनी दिली. व्यापा-यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस अतिशय सकारात्मक दिसले. त्यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिष्टमंडळाला सांगितले.

पर्यायी व्यवस्था सुचवावी
एलबीटी रद्द करावा ही व्यापा-यांची मागणी रास्त आहे. तथापि राज्यातील महापालिकांना विकासासाठी निधीही आवश्यक आहे. महापालिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार जो पर्याय सुचवेल त्याला व्यापा-यांनीही प्रतिसाद द्यावा. तसेच व्यापा-यांनी या कराला पर्याय सुचवणारे प्रस्ताव द्यावेत, असे आवाहनही फडणवीस यांनी केल्याची माहिती शहा यांनीदिली.