आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपाचा परिणाम : उपचाराअभावी चिमुरडी गतप्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिशोर - वैद्यकीय अधिका-यांचे काम बंद आंदोलन 18 दिवसांच्या चिमुरडीच्या जिवावर बेतल्याची घटना पिशोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. डॉक्टरांच्या संपामुळे चिमुरडीचा बळी गेल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

विद्या कल्पेश भारती यांनी 18 जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. 25 जून रोजी मुलीची तब्येत बिघडल्याने तिला पिशोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी डॉक्टरांनी काही औषधे देऊन घरी पाठवले. त्यानंतर 4 जुलै रोजी त्या चिमुरडीला पुन्हा त्रास झाला. तिच्या नाकातोंडातून रक्तस्राव होत होता.

नातेवाइकांनी पुन्हा पिशोर रुग्णालय गाठले. दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलीस रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांचा संप सुरू आहे, तुम्ही दहा वाजताच मुलीला रुग्णालयात आणायला हवे होते, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर मुलीच्या आईने वैद्यकीय अधीक्षक रतिभूषण गडवाल यांच्याकडे नेले, परंतु त्यांनी मुलीस तपासण्यास नकार दिला, असा आरोप मुलीच्या आईने केला, परंतु या विषयी गडवाल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तपासणीपूर्वीच ती मुलगी गतप्राण झाली होती. त्यामुळे मी त्यांना कंत्राटी डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठवले.

आमच्या चिमुरडीला रुग्णालयात अर्धा तास इकडून-तिकडे नेण्यात गेला. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले असते तर माझी नात वाचली असती, असे आजी संगीता गिरी यांनी सांगितले व हंबरडा फोडला.
लासूर स्टेशन आरोग्यं कें द्रात शस्त्रक्रिया ठप्प

डॉक्टरांच्या संपामुळे पाच दिवसांपासून लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेवर परिणाम दिसून आला. बुधवारी होणा-या महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. अनेक गरजू रुग्णांना नाइलाजाने खासगी दवाखान्याचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. डॉक्टरांचा संप लवकर मिटावा असे गरजू रुग्णांना वाटत आहे. येथील डॉक्टर 1 जुलैपासून सुरू झालेल्या सरकारी डॉक्टरांच्या संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

लासूर स्टेशन येथील रुग्णालयातील बाह्यरुग्ण, लसीकरण, प्रसूती व्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेची ससेहोलपट होत आहे. संपकरी डॉक्टरांच्या काही मागण्या राज्य शासनाकडे प्रस्तावित आहेत. परंतु अनेक वर्षांपासून निर्णय होत नसल्याने डॉक्टरांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. जिल्ह्यातील संपकरी डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर उपोषणास बसलेले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा मानस डॉक्टरांचा असल्याची माहिती लासूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद अल्हाट यांनी दिली.

उंडणगावात संपाचा परिणाम नाही
तालुक्यातील वैद्यकीय अधिका-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी डॉक्टर दिनापासून बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने तालुक्याची आरोग्यसेवा व्हेंटिलेटवर आहे, तर टँकरचे पाणी पिण्यासाठीदेखील वापरण्यात येत आहे. मात्र, हे पाणी शुद्ध आहे की नाही ही तपासणी करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते ग्रामसेवकदेखील संपावर गेल्याने ग्रामीण भागात साथ रोगांची शक्यता वाढली आहे.

फुलंब्री तालुक्यात जातेगाव, वडोदबाजार, बाबरा, आळंद व गणोरी या ठिकाणी पाच आरोग्य केंद्रे व त्यांच्या माध्यमातून 22 उपकेंद्रे चालतात. तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह 10 वैद्यकीय अधिकारी आहेत, तर शासकीय ग्रामीण रुग्णालयात अधीक्षकांसह चार वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र, 10 जुलैपासून या सर्व वैद्यकीय अधिका-यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या माध्यमातून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा रुग्णावर प्रतिकूल परिणाम होत आहे. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
माध्यमातून गावागावांत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते.