आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृत्व हरवलेल्या चिमुकल्याला चाइल्ड लाइनचा आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- काही दिवस भाड्याने राहून नंतर तुळजापुरातील एका कुटुंबाकडे पोटच्या चार वर्षांच्या चिमुकल्याला चार वर्षांपूर्वी सोडून गेलेली माता अद्याप परतली नाही. कोवळ्या वयात मायेचे छत्र हरवलेल्या या मुलाचा भूम तालुक्यातील एका शेतकर्‍याने सांभाळ केला. शोध घेत गेलेल्या चाइल्ड लाइनकडे मुलाने शिक्षणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने त्याला निरीक्षणगृहात पाठवले.

तुळजापूर शहरातील एका कुटुंबाकडे भाड्याने राहिलेली महिला अचानक मुलाला घरमालकाकडे सोडून निघून गेली. गाव, नाव, पत्ता माहिती नसल्याने या मुलाला सांभाळणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर संबंधित कुटुंबाने मुलाला भूम तालुक्यातील गोरमाळा (ता.भूम) येथील नातेवाइकाकडे सुपूर्द केले. वयाच्या चौथ्या वर्षीच संकट कोसळलेल्या मुलाने त्याचा सांभाळ करणार्‍या कुटुंबालाच नातेवाईक मानले.
गोरमाळे येथे एका कुटुंबाकडे अनाथ मुलगा आकाश असल्याची बातमी गावातील एका व्यक्तीने चाइल्ड लाइनला (1098) दिली. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी चाइल्ड लाइनचे कार्यक र्ते गोरमाळेत पोहोचले. चौकशी केल्यानंतर मुलाने शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर कुटुंबानेही मुलाला घेऊन जाण्यास संमती दिली.
आठ दिवसांपूर्वी चाइल्ड लाइनला फोन आल्यानंतर मुलाला संबंधित कुटुंबापासून वेगळे करण्याचे अवघड काम चाइल्ड लाइनच्या स्वयंसेवकांवर आले. मुलाला वेगळे करताना गुंतागुंतीचा तसेच भावनिक प्रश्न निर्माण झाला. गावात काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र चाइल्ड लाइनचे संचालक डॉ.दिग्गज दापके यांच्या नेतृत्वाखाली समन्वयक विजयकुमार माने, समुपदेशिका कांचन पाचकुडवे, हनुमंत साळुंके, बालाजी चव्हाण, परमेश्वर गरड, नरेंद्र तपिले, प्रशांत गायकवाड, पवन र्शीखंडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे मुलाला मदतीचा हात मिळाला.