आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१३ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला, वधू व वरपित्याला नोटिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो प्रतिकात्मक
बीड - पाटोदा तालुक्यातील करंजवन येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता तेरा वर्षांच्या मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात आला. पाटोदा पोलिस व तहसीलदार विवाह लागण्याच्या अगोदर अर्धा तास गावात गेल्याने बालविवाह टळला. पोलिसांनी वधू व वरपित्याला नोटिसा बजावल्या आहेत.

तालुक्यातील करंजवन येथील युवराज रावसाहेब उगलमुगले (२२) याचा विवाह गावातील ऊसतोड कामगाराच्या पंधरा वर्षांच्या मुलीबरोबर शनिवारी लावण्यात येणार होता. गावातील विवाहामुळेे दाेन्हीकडील दोनशेपेक्षा जास्त वऱ्हाडी लग्नस्थळी जमले होते. दरम्यान, हाेणाऱ्या बालविवाहाची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना कळाल्याने त्यांनी पाटोद्याच्या तहसीलदारांना गावात जाऊन विवाह रोखण्याचे सांगितले. दुपारी पावणेबारा वाजता तहसीलदार देशमुख आणि पोलिस निरीक्षक एस. डी. हुंबे यांनी विवाह रोखला.

मुलीचे वय पंधरा वर्षे असल्याने हा विवाह कायद्याने लावता येणार नाही, असे सुनावले. तेव्हा मुलीच्या वडिलांनी कायद्याविषयी माहिती नव्हती, असे सांगितले. नंतर मंडप काढला. तसेच जमलेले लोक घरी निघून गेले.

लग्नपत्रिका छापली
गावातच विवाह असल्याने ऊसतोड कामगाराने मुलीच्या विवाहाच्या लग्नपत्रिका छापून नातेवाइकांत वाटल्या होत्या. मुलीचे वय पंधरा वर्षांचे आहे. हे मात्र पालकाच्या लक्षात कसे आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...